Wednesday, February 15, 2023

🛑 प्राचार्य मा. सुनिलकुमार लवटेसर यांनी केलेले मार्गदर्शन ( मुख्य मुद्दे )

 🛑 प्राचार्य मा. सुनिलकुमार लवटेसर यांनी केलेले मार्गदर्शन ( मुख्य मुद्दे ) 

▪️१७ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनाला शुभेच्छा

▪️निपुण भारत अभियानाबाबत सांगितले.

▪️असर अहवाल : शैक्षणिक आरोग्य फारसं बरं नाही. याला आपण शिक्षकच जबाबदार आहोत असं शासन सांगत आहे. 

▪️2023 ते 2027 पर्यंत शिक्षकांना अंतर्मुख होण्याची गरज

▪️नव्या शैक्षणिक धोरणात शिक्षणावर किमान 6 % खर्च करु असे शासन सांगते. 

▪️2013 साली मसुद्यात सरकारी खर्चाच्या 20 % शिक्षणावर खर्च करण्याचं आश्वासन दिलेलं होतं.

▪️2013 ते 2020 पर्यंत 7 वर्षात 20 % चे 6 % झाले.

▪️जोपर्यंत सरकार शिक्षणावर अधिक गुंतवणूक करणार नाही , तोपर्यंत शिक्षणाचा दर्जा वाढणार नाही.

▪️सध्या भारतामध्ये 2.7 % इतका खर्च शिक्षणावर होतो आहे हे कटुसत्य आहे. याला शासन 3 % असे म्हणत आहे.

▪️शासन हा खर्च सुद्धा नाईलाजाने करत आहे असे वाटत आहे.

▪️पुढचा काळ शिक्षकांसाठी खूप बिकट असणार आहे.

▪️म्हणून समिती सारख्या संघटनांची जास्त गरज असणार आहे.

▪️वेंगुर्ल्यात शिरोडा हायस्कुलमध्ये अध्यापन केलेल्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेल्या शिक्षक वि. स. खांडेकर यांचं चरित्र सर्व शिक्षकांनी जरुर वाचायला हवे. एक शिक्षकच काय क्रांती घडवू शकतो याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे खांडेकर. त्यांच्यावर गांधीजींचा जास्त प्रभाव होता. 

▪️खांडेकरांनी मुलांबरोबर मुलींनाही शाळेत आणलं. ( १०० वर्षांपूर्वी ) 

▪️खांडेकर मास्तरांची विचारदृष्टी पुनश्च आजच्या शिक्षकांमध्ये रुजवण्याची गरज आहे.

▪️अंदाजे 6 कोटी शाळाबाह्य मुले शाळेत आली पाहिजेत हे आजच्या शिक्षकांसमोरील आव्हान आहे.

▪️जगातील नंबर एक शिक्षण देणारा देश फिनलँड आहे. 

▪️तिथे टीचर्स अकादमी आहे. ती शासनाला सांगते , शासनावर त्यांचं नियंत्रण आहे.

▪️म्हणून आपण शिक्षक म्हणून आपले अधिकार वापरणं ही काळाची गरज आहे. आपले अधिकार आपण गमावून बसत आहोत. 

▪️आपण शिक्षक आहोत. आपण शिकवणार आहोत , तर काय शिकवायचे तेही आपणच ठरवलं पाहिजे. 

▪️आपल्याला शासन सांगतं की आम्ही सांगतो ते तुम्ही शिकवा.

▪️शिक्षण हा जसा आमचा हक्क आहे , तसाच शिक्षणातील परिवर्तन आणि शिक्षणाचं धोरण हा सुद्धा आपला हक्क असायला हवा. असं येत्या काळामध्ये प्रत्येक शिक्षकाने म्हटलं पाहिजे.

▪️राज्य महाअधिवेशनाला मा. मुख्यमंत्री , शिक्षणमंत्री , शिक्षण सचिव , शिक्षण संचालक यांची उपस्थिती असणार आहे , त्यावेळी समितीच्या नेत्यांनी त्यांना हे सांगण्याची गरज आहे. शिक्षणातील जी धोरणं ठरविण्यात येतील त्यात आम्हा शिक्षकांना विचारात घेतलं गेलं पाहिजे. 

▪️शिक्षकांचा स्वाभिमान टिकून राहिला पाहिजे. मान टाकून , पाठीला कुबड काढून राहिलो तर आम्ही यापुढे गुलाम शिक्षक होणार आहोत. 

▪️कोणत्याही प्रकारचा घाला शिक्षकांच्या हक्कावर आला तर सहन करुन चालणार नाही.

▪️येणारी आव्हानं समजली पाहिजेत , ती परतवून टाकण्याचं सामर्थ्यही आपण आपल्यात निर्माण करायला हवीत. 

▪️चांगल्या गोष्टींचं स्वागतच करायला हवं.

▪️माझ्या देशातल्या मुलांचं शिक्षण हे चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे हे प्रत्येक शिक्षकाला वाटलं पाहिजे.

▪️शासन डिजिटल शिक्षणाबद्दल बोलत आहे. पण 3 % देखील खर्च करत नाही. तर मग दर्जेदार शिक्षण कसं होणार ? हेही आपल्याला शासनाला सांगता यायला हवं.

▪️दिल्लीमध्ये जे सरकार आलं ते शिक्षणावर 25 % खर्च करणार या अजिंड्यावर निवडून आलं. 

▪️दिल्लीमध्ये प्राथमिक शाळा सुद्धा सर्व सुविधायुक्त आहेत.

▪️जी सरकारे शिक्षणावर खर्च करतात , त्या देशाचा ' आनंदी निर्देशांक ' उच्चतम असतो. ( Happiness Index )

▪️शिक्षणामधील गुंतवणूक ही खऱ्या अर्थाने मानवी गुंतवणूक आहे हे शासनाला समजून दिलं पाहिजे. 

▪️युरोपमधील सर्वांत मोठी रेल्वे तीन डब्यांची असते. या तीन डब्यांचं केव्हाही आरक्षण मिळतं.आपल्या भारतातील रेल्वेला किमान 18 डबे किंवा कमाल 24 डबे असतात. डबे वाढले किंवा प्लॅटफॉर्म वाढले म्हणजे विकास होतो असे नव्हे. येथे दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे. 

▪️खाणारे हात वाढले , खाणारी तोंडं वाढली की विकास खुंटतो. हे सर्व शिक्षकांनी आपल्या पालकांना समजावून सांगितले पाहिजे.

▪️हम दो हमारे , हम दो हमारा एक वरुन आता ' डबल इन्कम नो कीड ' असं विकासाचं मॉडेल बदलत चाललं आहे. हेही माहीत असलं पाहिजे. 

▪️जागतिक दर्जाचं शिक्षण आपल्याला नव्या पिढीला द्यायचं आहे.

▪️तीन शिक्षकांचं काम एका शिक्षकाला देऊन गुणवत्ता मिळणार नाही. त्यासाठी विद्यार्थी , शिक्षक याचं प्रमाण नेमकं असायला हवं. जगामध्ये 20 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असं आदर्श प्रमाण आहे. तसं नसेल तर गुणवत्तेच्या गप्पा मारणं निरर्थक असेल.

▪️एक शिक्षक 20 विद्यार्थ्यांकडे जास्तीत जास्त लक्ष देऊ शकतो. ( Span of attention )

▪️विद्यार्थी शिक्षक प्रमाण हे विसाला एक असाल पाहिजे असा ठराव संमत करुन शासनाला पाठवला पाहिजे. आग्रही मागणी असली पाहिजे.

▪️नवीन धोरणामध्ये शिक्षकाला शाळाबाह्य कामे देऊ नयेत असं असतानाही नवनवीन कामे सुचविण्याचे काम करीत आहे. 

▪️आपण आपलं शिक्षण सतत सुरु ठेवलं पाहिजे. शिक्षकांनी आपली शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता सतत वाढवत नेली पाहिजे. पदव्युत्तर पदवी प्रत्येकाने घेतली पाहिजे. नाहीतर पुढे शिकवणं किंवा शिक्षण प्रवाहात राहणं अवघड आहे.

▪️काही देशांमध्ये शिक्षक जाहिरात दिली जाते. त्यात प्रत्येक शिक्षक डॉक्टरेट केलेला हवा असतो. बालवाडीसाठी डॉक्टरेट ही किमान पात्रता असते. त्याच्याकडे स्वतःचा लॅपटॉप असायला लागतो. 

▪️जग असं मानत असतं , की शिक्षकांचं स्वतःचं पुस्तकालय पाहिजे , शिक्षकांचा स्वतःचा लॅपटॉप पाहिजे , शिक्षकांचं स्वतःचं संशोधन पाहिजे , शिक्षक बोलणारा पाहिजे , शिक्षक लिहिणारा पाहिजे. 

▪️जागतिक दर्जाचं शिक्षण द्यायचं असल्यास आपल्याला आपला दर्जाही उंचवायचा आहे.

▪️बाळ जन्माला आलं की ते देशाचं असेल. पुढील काळात याची नोंद शिक्षकाने करायची आहे. 

▪️हळूहळू अंगणवाडी सेविका , आशा सेविका यांची कामंही शिक्षकांना करावी लागण्याची शक्यता दिसते आहे. 

▪️शिक्षकाला माहीत असलं पाहिजे की पुढील वर्षांमध्ये आपल्याकडे किती विद्यार्थी असणार आहेत.

▪️येथून पुढे 3 वर्षांपासूनची मुले प्राथमिक शाळेला जोडली जाणार आहेत. 

▪️हळूहळू डीएड बंद होईल.

▪️त्यामुळे बीएड करणं ही काळाची गरज आहे.

▪️वाचन , लेखन , संख्याज्ञान आणि विज्ञान ह्या मुलभूत संकल्पना मुलांना आल्या पाहिजेत. 

▪️आपलं शिक्षण आता तोंडी राहणार नाही. 

▪️पालकांच्या अपेक्षा खूपच वाढल्या आहेत. त्या पूर्ण करताना आपण कमी पडता कामा नये.

▪️आपल्या गाफिल राहण्याने शिक्षणावरचा खर्च कमी कमी होत चालला आहे.

▪️भविष्यकाळातील शिक्षण हे व्हर्चुअल होणार आहे. शिक्षकांनी त्याची तयारी ठेवली पाहिजे. 

▪️फॉर्मल आणि ऑनलाईन शिक्षण असे दोन प्रकार निर्माण झाले आहेत. शिक्षण आता मुक्त झाले आहे.

▪️पुढील काळात विद्यार्थी ठरवणार आहेत. त्यामुळे आपण त्यांच्यापुढे जाणं ही काळाची गरज आहे.

▪️यापुढे केंद्रीय अभ्यासक्रम राबविला जाईल. त्यांची भाषांतरे करुन राज्यांना अंमलबजावणी करावी लागणार आहे. 

▪️शिक्षणाचा प्रवास हा केंद्रीय शिक्षण पद्धतीकडे जातो आहे हे लक्षात घ्या.

▪️नव्या शैक्षणिक धोरणामध्ये परीक्षा नाही. क्षमता चाचण्या होतील. फक्त बारावीची केंद्रीय परीक्षा होईल. 

▪️आता सर्व शिक्षकांना सर्व विषय शिकवावे लागणार आहेत.

▪️जसं GST चं झालं आहे , तसं आपल्या शिक्षणाचं होऊ लागलेलं आहे.

▪️जर 2024 नंतर हेच शासन राहिलं तर हे पुढे असंच चालू राहणार यात कोणतीही शंका नाही.

▪️त्रिभाषा सूत्र : समजून घ्या.

▪️आपल्याला कदाचित पुढे संस्कृत भाषा शिकवावी लागणार आहे. आपली स्वायत्तता हळूहळू कमी होत चालली आहे.

▪️यावरही शिक्षक समितीने गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.

▪️वर्तमानकाळातील जिल्हा परिषदेत काम करणारे शिक्षक गाफिल आहेत. ह्या सगळ्या शिक्षकांचा ' ससा ' झालेला आहे. 

▪️जन्माला आलेलं प्रत्येक बाळ आपल्याच शाळेत येणार हा आपला अहंकार आता आपल्यालाच नडणार आहे. 

▪️अकरावीच्या विद्यार्थ्यांना आधीच बारावीचं शिकवलं जाऊ लागलं आहे. ते अकरावी पास व्हायच्या आधीच. 

▪️आपण शिकवत नाही , त्यामुळे इतरांचं म्हणजे क्लासवाल्यांचं फावतं. शाळेत क्लास होत नाहीत , क्लासमध्ये होतात. 

▪️शिक्षकांचे प्रकार : 

1️⃣ रोजंदारीवर काम करणारा शिक्षक

2️⃣ कंत्राटी शिक्षक

3️⃣ विनाअनुदानित शिक्षक

4️⃣ निमअनुदानित शिक्षक

5️⃣ स्वयंशासित शिक्षण संस्थेतील शिक्षक

6️⃣ जिल्हा परिषद शिक्षक

7️⃣ खाजगी शाळेतील शिक्षक

▪️2000 ते 200000 रुपये असा पगार असणारे शिक्षक असतील तर त्यावर समितीने काम करण्याची गरज आहे. 

▪️आपण आज सुरक्षित आहोत , म्हणून आपला ' ससा ' झाला आहे. पण ' कासव ' कधी येऊन आपल्यावर विजय मिळवून जाईल ते आपल्याला समजणार नाही. म्हणून आज जागं होण्याची गरज आहे. हे वास्तव आहे. 

▪️सध्या पॅकेजचे युग आलेले आहे. तीन महिन्यात घरी बसून 25000 रुपयांत शिक्षण देणारी चॅनल्स यु ट्यूबवर उपलब्ध झाली आहेत. हीसुद्धा आपल्यासाठी आव्हानेच आहेत. ऑनलाईन शिक्षणाचा फंडा आपल्याही घरात आला आहे. 

▪️हे शिक्षणाचं आव्हान आपण समजून घेतलं पाहिजे. 

▪️पूर्वी आपण बँकेत जायचो , चेक वापरायचो ..... आता आपण हे काहीही करत नाही. घरबसल्या ऑनलाइन व्यवहार करतो. तसेच शिक्षणाचे झाले आहे. 

▪️ऑनलाईन शिक्षण सिस्टीमने फॉर्मल शिक्षणाला मोठा धक्का दिला आहे. 

▪️आताचा धक्का हा कमी प्रमाणात बसतो आहे , पुढे तो किती तीव्रपणे बसेल याची कल्पना करा. 

▪️तुमच्याकडे दिलेल्या मुलांचं व्यक्तिगत कौशल्य ओळखा आणि त्यांचं व्यक्तिगत विकास घडवा. येथून पुढे शिक्षकाला ' प्रत्येक मुलाला ' ( one to one ) शिकवायचे आहे. 

▪️यापुढे ' सेवाज्येष्ठता ' हा शब्द असणार नाही. तर ' श्रेष्ठता ' असा शब्द असणार आहे. ज्यांच्यामध्ये अध्यापनकौशल्य असेल , तोच या व्यवसायात टिकून राहील. 

▪️सिस्टीम असं सांगते की आता तुम्ही स्वतःला प्रुव करायचे आहे. 

▪️तुमच्या अध्यापन शैलीवर तुमची नोकरी टिकून राहू शकते.



राज्य महाअधिवेशन : वेंगुर्ला : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

 



































































































































बेमुदत साखळी धरणे आंदोलन : प्रशासनाची सकारात्मक चर्चा आणि यश

 ​🚩 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा सिंधुदुर्ग 🚩 ​बेमुदत साखळी धरणे आंदोलन: प्रशासनाशी सकारात्मक चर्चा आणि यश! 😊🤝 ​सिंधुदुर...